पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ लघुग्रह. आपल्या सूर्यमालेत हे लघुग्रह हजारों असावेत. लघुग्रह हे आपल्या नांवाप्रमाणे फार लहान असल्यामुळे त्यांविषयीं विशेष माहिती अद्यापपर्यंत मिळाली नाहीं. हे ग्रह आपल्या आंसावर किती वेळांत फिरतात, ह्मणजे यांवर दि वस रात्रींचें मान केवढे आहे हे अजून समजण्यांत आलें नाहीं. तसेंच, या ग्रहांवर वातावरण आहे कीं नाहीं हेंहि सांगतां येत नाहीं. तथापि, दिवसेंदिवस दुर्बिणींत सुधारणा होत जा- ईल, व या लघुग्रहांविषयीं सुद्धां पुष्कळ माहिती मनुष्यजा- तीस पुढे मिळेल, असें अनुमान करण्यास पुष्कळ जागा आहे. आपणांस लघुग्रहांविषयीं जरी फारशी माहिती नाहीं, तरी इतकी गोष्ट खचित आहे कीं, जर या लघुग्रहांवर प्राणी असतील, तर त्यांची शरीररचना आपल्या पृथ्वीवरील प्राण्यां- च्या शरीररचनेहून अगदीं भिन्न प्रकारची असली पाहिजे. ही गोष्ट गणितशास्त्राच्या साह्यानें सहज सिद्ध करितां येते. फ्लोरा या नांवाचा एक लघुग्रह आहे. याचा व्यास १०० मैल आहे. पृथ्वीचा व्यास ८००० मैल असल्यामुळे पृथ्वीच्या व्यासाच्या ८० पट लहान फ्लोराचा व्यास येतो. एकंदर सर्व गोष्टींत जरी फ्लोरा व पृथ्वी यांचें पूर्ण साम्य आहे असे धरलें, तरी फ्लोरा या लघुग्रहाच्या व्यासाहून पृथ्वीचा व्यास ८० पट मोठा असल्यामुळे पदार्थांचें वजन पृथ्वीवर ८० पट अधिक आहे असे आढळून येईल. ह्मणजे, जो पदार्थ पृथ्वी-