पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ अंतरिक्षांतील चमत्कार. भरतें. सूर्याभोंवतीं एक फेरा करण्यास याला ४ वर्षे ४ महिने लागतात. लघुग्रहांपैकी प्रथम शोधून काढलेला जो सीरीस ग्रह त्याचें तेज व्हेस्टापेक्षा कमी आहे. तरी, हा ग्रह नु- सत्या डोळ्यांनींहि कधींकधी पाहण्यांत येतो. सीरीसचें सूर्यापासून अंतर २६ कोटि मैल आहे; ह्मणजे हा ग्रह आपणांपासून १६ कोटि मैल दूर आहे असें होतें. या ग्रहाचें तेज तांबूस असल्यामुळे हा तांबड्या ताऱ्यासारखा दिसतो. हा ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षां १३०० पट लहान आहे, ह्मणजे या ग्रहासारखे ४६०० ००० ग्रह एकत्र करून एक मोठा गोळा बनविला, तर तो आपल्या पृथ्वीएवढा मोठा होईल. प्यालास ह्मणून जो लघुग्रह आहे त्याचा व्यास १६७ मैल आहे. हा ग्रह जेव्हां पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हां हा सुंदर पिवळ्या रं- गाच्या ताज्यासारखा दिसतो. आजपर्यंत शोध लागलेल्या लघुग्रहांची संख्या ४०० च्या जवळ जवळ गेली आहे हे मागें सांगण्यांत आलेच आहे. आणखी नवीन नवीन लघुग्रहांचा शोध दर वर्षी लागतच आहे ! तेव्हां, सूर्यमालेत एकंदर लघुग्रह आहेत तरी किती? हें अर्थात् निश्चयपूर्वक कोणासहि सांगतां येणार नाहीं. लीव्हेरियर या विद्वान् फ्रेंच ज्योतिष्यानें गणितशास्त्राच्या आधारानें असें अनुमान काढिलें आहे कीं, लघुग्रहांची संख्या १ लक्ष ० हजार असावी ! आतां, ही संख्या फारच मोठी होते असें जरी मानिलें, तरी एवढें खचित दिसतें कीं,