पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लघुग्रह. १२७ तो इतका कीं, आजपर्यंत आढळण्यांत आलेल्या लघुग्रहांची संख्या आज ४०० च्या जवळ जवळ आली आहे. मागें तिसऱ्या भागांत दिलेल्या ३ या आकृतीवरून लघुग्रहाचा प्रदेश सूर्यमालेंत कोठें आहे हें दिसून येईल. हे ग्रह एकमेकांच्या फार जवळ आहेत, आणि यांच्या कक्षा एकमेकांच्या कक्षांत जशाकांहीं गुंतून गेल्या आहेत, असें वाटतें. या लघुग्रहांचीं सूर्यापासून अंतरें बहुतेक एकमेकांच्या जवळ जवळ आहेत. यावरून, कित्येक असें ह्मणतात कीं, पूर्वी कधींकाळी मंगळ व गुरु यांच्यामध्यें एक मोठा ग्रह होता, आणि कांहीं विलक्षण कारणानें त्या ग्रहाचे कुलपी गोळ्याप्रमाणें तुकडे तुकडे झाले; आणि, ते तुकडे हे सध्यांचे लघुग्रह होत! मग खरें कारण काय असेल तें असो ! आतां, या लघुग्रहांपैकीं कांहींविषयीं थोडीशी माहिती सांगून हा भाग पुरा करूं. व्हेस्टा हा ग्रह लघुग्रहमंडळींत सर्वांहून तेजस्वी दिसतो. हा ग्रह स्वच्छ काळोख्या रात्रीं दुर्बिणीवांचून नुसत्या डोळ्यांनी देखील दिसतो. याचें सू- र्यापासून मध्यम अंतर २२ कोटि ३० लक्ष मैल आहे. याचा व्यास सुमारें २५० मैल आहे, आणि सूर्याभोवतीं एक प्रदक्षिणा करण्यास याला सुमारें ३ वर्षे ८ महिने लागतात. ज्यूनो हा लघुग्रह नुसत्या डोळ्यांनीं दिसत नाहीं. याचा रंग तांबूस आहे, आणि याचें तेज कमीअधिक होत असतें. या ग्रहाचें सूर्यापासून मध्यम अंतर २४ कोटि मैल