पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लघुग्रह. १२५ शुक्र ७.२; पृथ्वी १०; मंगळ ११.२; गुरु १२०९; शनि ९९.४ आणि युरेनस १९६. ह्मणजे, पृथ्वीचें सूर्यापासून अंतर सरासरी १० कोटि मैल धरलें-आणि हें अंतर १० कोटि मैलांच्या जवळ जवळ आहेच तर बुधाचें अंतर ३,० कोटि मैल येतें; आणि त्याच प्रमाणांनीं वर सांगितल्याप्रमाणे इतर ग्रहांचीं अंतरें येतात, आणि तीं बहुतेक तशीं आहे- तहि. आतां, वर सांगितलेल्या आंकड्यांची माला प्रथम मांडून तिच्याखालीं ग्रहांचीं नांवें याप्रमाणे लिहावीं:- - १०, १६, २८, १२, १००, १९६. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनस. यावरून कोणाच्याहि लक्षांत सहज येण्यासारखें आहे कीं, इतर आंकड्यांप्रमाणे २८ ह्या आंकड्यानें ज्याचें सूर्यापासून अंतर दाखविले जाईल, असा एखादा ग्रह सूर्यमालेंत असला पाहिजे. ह्मणून मंगळ व गुरु यांच्यामध्ये एखादा ग्रह असावा याविषयीं गेल्या शतकांतील ज्योतिप्यांस इतकें खात्री- पूर्वक वाटू लागलें कीं, तो अज्ञात ग्रह शोधून काढण्याक- रितां प्रख्यात ज्योतिष्यांची एक मंडळी स्थापन करण्यांत आली. -

  • युरेनसाच्या पलीकडील नवीन शोधून काढलेला ग्रह जो नेप्च्यून,

त्याचें सूर्यापासून अंतर या नियमाप्रमाणे ३८८ असावयास पाहिजे. परंतु नेप्च्यूनचें वास्तविक अंतर ३०० आहे. तेव्हां, हा नियम सर्वथैव खरा आहे असें ह्मणतां येत नाहीं. तरी नेप्च्यूनशिवाय सर्व ग्रहांचीं सूर्यापासून अंतरें वरील नियमाप्रमाणें निघतात हे मोठे चमत्कारिक आहे !