पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ अंतरिक्षांतील चमत्कार. गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत सूर्यमालेतील जे सात ग्रह माहीत होते, त्या ग्रहांचीं सूर्यापासून अंतरें आणि त्यांचीं परस्परांमधील अंतरें यांविषयीं सूक्ष्म विचार करून पाहतां, त्या काळांतील ज्योतिप्यांस असें दिसून आलें कीं, सूर्यमालेत मंगळ व गुरु या दोन ग्रहांमध्ये असावी त्यापेक्षां जास्त जागा रिकामी आहे. यास्तव, या दोन ग्रहांमध्ये कोणता तरी एक ग्रह असावा असे त्यावेळी लोकांचे मनांत येई, परंतु शोध करून पाहतां अशा अज्ञात ग्रहाचा थांग मुळींच लागेना; ह्मणून त्याचा शोध लावण्याचें काम ज्योति- प्यांनीं बहुतेक सोडून दिलें. पुढे, सूर्यापासून ग्रहांच्या अंतरांविषयीं एक चमत्कारिक नियम आढळून आला. तो असा. आपण पुढे लिहिल्याप्रमाणें आंकडे मांडावे: -०, ३, ६, १२, २४, ४८, ९६, १९२. या आंकड्यांविषयीं अंमळ विचार केला असतां, वाचकांच्या सहज लक्षांत येईल कीं, दुसरा आंकडा ३ याखेरीज प्रत्येक पुढील आंकडा मागील आंकड्याच्या दुप्पट आहे. आतां, या प्रत्येक आंक- ड्यांत ४ ही रक्कम मिळविली तर, पुढे लिहिल्याप्रमाणें आंकड्यांची माला होईल:- ४, ७, १०, १६, २८, ५२, १००, १९६. या मालेतील पांचवा आंकडा २८ याशिवाय बाकीचे सर्व आंकडे अनुक्रमें सात ग्रहांच्या सूर्यापासून अंत- रांचे बहुतेक दर्शक आहेत असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. ग्रहांचीं वास्तविक अंतरें आहेत ती अशी:-बुध ३. ९ ;