पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ९. लघुग्रह. या १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, आणि युरेनस हे सातच ग्रह सूर्यमालेत आहेत असे सर्व लोक समजत असत. परंतु, या शतकांत आणखी पुष्कळ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे, आणि त्यामुळे सूर्यमालेचा विस्तार व महत्त्व हीं पुष्कळच वाढलीं आहेत. आतां, या शतकांत सांपडलेले जे ग्रह, त्यांपैकीं नेप्- च्यून या एकाच ग्रहाचा आकार आपल्या पृथ्वीपेक्षां पुष्कळ पटीनें मोठा आहे. परंतु, बाकीचे नवीन सांपडलेले ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षां शेंकडों पटीनें लहान आहेत. यास्तव, यांस लघुग्रह - ह्मणजे लहान ग्रह - अशी संज्ञा दिली आहे. इंग्रजी भाषेंत लघुग्रहांस अस्टराइड् (asteroids) असें ह्मणतात. हे ग्रह इतके लहान आहेत कीं, ते बहुधा नुसत्या डोळ्यांनीं दिसतच नाहींत-तरी या ग्रहांची एक स्वतंत्र संस्थाच बनली आहे, असें दिसून येतें.