पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ अंतरिक्षांतील चमत्कार. एका फळीवर एक कागदाचें पान चिकटवावें, आणि नंतर दोन टांचण्या त्यावर लावाव्या. मग एक दोऱ्याचा तुकडा घेऊन त्याचीं दोन टोंकें आतां सांगितलेल्या दोन टांचण्यांभोवती अशीं बांधावीं कीं, दोरा मध्यभागीं सैल राहील, आणि मग, २३ व्या आकृतींत दाखविल्याप्रमाणें एक पेन्सिल घेऊन आकृति काढावी, ह्मणजे एक सुरेख दीर्घ- वर्तुल निघेल. या रीतीनें आपणांस जसें पाहिजे तसें दीर्घव- तुल सहज काढितां येतें. या आकृतींत टांचण्या मारलेलीं जीं दोन स्थळे आहेत, त्यांस दीर्घवर्तुलाचीं केन्द्रे ह्मणतात. प्रत्येक दीर्घवर्तुलास दोन केन्द्रे असतात. या २३ व्या आकृती- प्रमाणें कमीजास्त दीर्घवर्तुलाकार प्रत्येक ग्रहाची कक्षा आहे, व या कक्षेच्या एका केन्द्रस्थानीं सूर्य असतो. ह्मणून, ग्रहाचें सूर्यापासून अंतर नेहमीं सारखें नसतें, कधीं कमी असतें व कधीं जास्त असतें.