पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० अंतरिक्षांतील चमत्कार. दिसत असेल, आणि कित्येक संक्रमणांच्या वेळीं ह्मणजे अमा- वास्येस किंवा पौर्णिमेस पृथ्वीसंक्रमण झाले असतां चंद्र हा मुळींच दिसत नसेल. त्याचप्रमाणे मंगळावरून गुरूचा आकार चांगला स्पष्ट दिसत असेल, व गुरूचे चंद्रहि नुसत्या डोळ्यांनी मंगळावरील लोकांस दिसत असतील. शनीचीं कडीं व युरेनस हीं सुद्धां मंगळावरील लोकांस सहज दिसत असतील! आणि नेप्च्यू- नचा शोधहि त्यांनीं आपणांपेक्षां फार लवकर लाविला असेल. मंगळ या ग्रहाचें वर्णन करीत असतां एका प्रसिद्ध अर्वा चीन ज्योतिष्याच्या नांवाचें व त्यानें केलेल्या अद्वितीय शो- धांचें स्मरण झाल्यावांचून राहत नाहीं. यूरोपखंडांत सतरा- व्या शतकांत केप्लर या नांवाचा एक महान् उद्योगी व वि- द्वान् ज्योतिषी होऊन गेला. मंगळाच्या कक्षेचा आकार कसा आहे हे ठरविण्याकरितां त्यानें मंगळाचे वेध घेण्याचें काम सतत १८ १९ वर्षे चालविले होतें. व त्यावरून गणित करून त्यानें ग्रहांच्या गतींविषयीं तीन नियम बसविले. या नियमांस 'केप्लरचे नियम' असें ह्मणतात. केप्लरच्या काळापर्यंत सर्व ज्योतिषी असें समजत असत कीं, ग्रहांच्या कक्षा पूर्ण वर्तुलाकार आहेत. व केप्लरचा सुद्धां असाच समज कित्येक दिवसपर्यंत होता. परंतु, कांहीं दिवस मंगळाचे वेध घेतल्या- वर त्यास असे आढळून आलें कीं, मंगळाची कक्षा बरोबर वर्तुलाकार नसावी. पुढें, निरनिराळ्या आकृतींविषयीं विचार