पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगळ. ४० हजार मैल आहे. परंतु, मंगळाचा दूरचा चंद्र फक्त १२६०० मैलांवर आहे ! यावरून असे वाटतें कीं मंग- ळाच्या चंद्रावर लोक असल्यास ते मंगळावरील लोकांस दु- विणींतून सहज दिसून येतील ! आपणांस जशी शुक्राची चांदणी दिसते, त्याप्रमाणें आपली पृथ्वी मंगळावर लोक असल्यास त्यांना अंतरिक्षांत दिसत असेल. आपल्या पृथ्वीचे अंतर्वर्ती ग्रह जे बुध आणि शुक्र त्यांचें आपणांस जसें बुधसंक्रमण आणि शुक्रसंक्र- मण दिसतें, तसें मंगळावरील लोकांस पृथ्वीसंक्रमणहि दिसत असेल. कारण कीं आपल्या पृथ्वीला जसे बुध आणि शुक्र हे अंतर्वर्ती ग्रह आहेत, तसे मंगळाला हे दोन्ही अंत- वर्ती ग्रह असून त्यांशिवाय पृथ्वी ही आणखी एक तिसरा अंतर्वर्ती ग्रह आहे. आपणांस बुधसंक्रमणाचे आणि शुक्र- संक्रमणाचे वेळीं नुसते बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्यवित्रा- वरून जातांना दिसतात. परंतु मंगळावरील लोकांस पृथ्वी- संक्रमणाच्या वेळीं आणखी एक विशेष चमत्कार दिसत असेल. तो हा कीं, पृथ्वीच्या बरोबरच तिचा सहचारी जो चंद्र त्याचेंहि संक्रमण त्यांना दिसत असेल. इतकेंच नाहीं; तर याहूनहि विशेष चमत्काराची गोष्ट ही कीं, अशा कांहीं पृथ्वीसंक्रमणांच्या वेळीं हा चंद्र पृथ्वीच्या वरच्या बाजूस दिसत असेल, कांहीं संक्रमणांच्या वेळीं खालच्या बाजूस दिसत असेल, कांहींच्या वेळीं उजव्या किंवा डाव्या बाजूस