पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ अंतरिक्षांतील चमत्कार. आग्रहपूर्वक विनंतीवरून हातीं घेतलेलें काम आणखी कांहीं दिवस चालविलें. व पुढें चार पांच दिवसांतच मंगळाचा पहिला चंद्र आगष्ट महिन्याच्या ११ वे तारखेस हॉल यांच्या दृष्टीस पडला ! व दुसरा चंद्र त्याच महिन्याचे १७ वे तार- खेस त्यांच्या दिसण्यांत आला ! याप्रमाणें सन १८७७ या सालीं मंगळाच्या दोन चंद्रांचा शोध लागला. मंगळाचे हे दोन चंद्र फार लहान आहेत. व यांचें मंग- ळापासून अंतरहि फार थोडें आहे. पहिला चंद्र मंगळापासून फक्त ४००० मैल दूर आहे. व त्याचा व्यास सुमारें ७ मैल येईल. दुसरा चंद्र मंगळापासून १२६०० मैल दूर आहे. व त्याचा व्यास ६ मैल आहे. ह्या चंद्रांची मंगळाभोंवतीं फिर- ण्याची गतिहि फार जलद आहे. पहिल्या चंद्रास मंगळाभों- वतीं एक फेरा पुरा करण्यास ७ तास ३९ मिनि व १५ सेकंद इतका वेळ लागतो; व दुसन्यास ३० तास १७ मिनिटें १४ सेकंद इतका वेळ लागतो. आपल्या पृथ्वीच्या चंद्राचा व्यास २००० मैल आहे. तेव्हां आपल्या चंद्राहून हे मंगळाचे चंद्र फारच लहान आहेत. आपला चंद्र आपल्या हिंदुस्थान देशाहू- नहि मोठा आहे. पण मंगळाच्या चंद्रांचा आकार आपल्या येथील मुंबई किंवा कलकत्ता या शहरांएवढा सुद्धां येणार नाहीं ! मंगळाचे चंद्र इतके जरी लहान आहेत, तरी मंगळावरून ते बरेच मोठे दिसत असतील. कारण, ते मंगळापासून फार जवळ आहेत. आपल्या चंद्राचें आपल्या पृथ्वीपासून अंतर २ लक्ष