पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( मंगळ. ११७ ज्ञांनी मंगळाच्या चंद्राचा शोध लावण्याचे काम सोडिलें नाहीं. कारण, त्यांस असे वाटत असे कीं, पृथ्वीपासून अखेर नेप्- च्यूनपर्यंत जितके ह्मणून सूर्यमालेत ग्रह आहेत, तितक्या सर्वांत एकट्या मंगळालाच उपग्रह किंवा चंद्र नसावा आणि इतरांस चंद्र असावेत, ही गोष्ट अंमळ विसंगत दिसते. तेव्हां मंगळास एखादा दुसरा तरी चंद्र खचित असावा, व त्याचा कधीं तरी शोध लागेल, अशा अर्थाचे उल्लेख पूर्वीच्या ज्योतिषशास्त्रावरील बहुतेक ग्रंथांतून आढळून येतात. सन १८७७ साली मंगळ पृथ्वीच्या फारच जवळ आला होता, व यावेळी मंगळ आपणांपासून ३ कोटि ५० लक्ष मैल मात्र दूर होता. अशी उत्तम संधि आली असतां, ज्यांना मंगळास चंद्र आहे असे वाटत असे, अशा ज्योतिष्यांनी मंगळाच्या चंद्राचा शोध लविण्याकडे विशेष लक्ष दिलें. याप्रमाणें अमे- रिकेंतील वाशिंगटन राजधानींतील प्रसिद्ध ज्योतिषी प्रोफेसर हॉल यांनी मंगळाचे चंद्राचा शोध लावण्याच्या उत्कट हेतूनें या ग्रहाचे वेध घेण्याचे काम सुरू केले. परंतु, बरेच दिवस सूक्ष्म वेध घेतले तरी, मंगळास चंद्र आहेत असें हॉल यांना दिसून आलें नाहीं. तेव्हां त्यांना असे वाटू लागले कीं, एक तर मंगळ चंद्रहीन ग्रह आहे, किंवा याचे चंद्र इतके लहान असतील कीं ते दिसण्याचा संभव नाहीं. याप्रमाणें निराश होऊन प्रोफेसर हॉल मंगळाच्या चंद्राचा शोध लावण्याचें काम सोडून देणार होते. पण त्यांनी आपल्या बायकोच्या