पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. पृथ्वीच्या वर्षाच्या दुप्पट असल्यामुळे तेथील ऋतुहि येथल्या- पेक्षां दुप्पट मोठे असतील. मंगळ ग्रह पुष्कळ अंशीं पृथ्वीप्रमा- णेंच आहे. बहुतेक पृथ्वीवरील दिवसाएवढाच दिवस मंगळावर असतो; आणि रात्रहि तेवढीच असते. येथल्यापेक्षां जरी मं- गळावरील ऋतु मोठे असतात, तरी पृथ्वीप्रमाणेच मंगळावर ऋतूंचा बदल होतो असें दिसतें. तसेंच, मंगळावर जमीन आहे व पाणीहि आहे. तेथें वातावरणहि आहे. या सर्व गो- ष्टींचा विचार केला असतां, मंगळावर येथल्याप्रमाणे प्रा- ण्यांची वसति असेल काय, हा प्रश्न आपले मनांत सहज येतो. या प्रश्नाचें उत्तर अर्थात् खात्रीपूर्वक असें आपणांस देतां येत नाहीं हें उघड आहे. कारण कीं, मंगळावर जाऊन प्रत्यक्ष पाहण्याची शक्ति आपणांस कोठें आहे? परंतु मंगळाचे ● आणि पृथ्वीचें पुष्कळ प्रकारांनी साम्य आहे, ह्मणून तेथें व सति असण्याचा संभव आहे, इतकेंच ह्मणून तूर्त तरी आ- पणांस स्वस्थ बसले पाहिजे ! पृथ्वीभोवती फिरणारा एक चंद्र आहे, आणि गुरूभोंवतीं फिरणारेहि चंद्र आहेत. मंगळ हा पृथ्वी व गुरु यांच्या मध्यें आहे. तेव्हां मंगळास चंद्र (उपग्रह ) कां नसावा ? असे मनुष्याचे मनांत सहज येत असे. परंतु, मंगळास चंद्र आहे, असें सन १८७७ या वर्षापर्यंत समजून आलें नाहीं. तेव्हां, मंगळ या ग्रहास चंद्र नाहीं असा बहुतेक ज्योतिषी लोकांचा समज होऊन चुकला होता. तरी, कांहीं विद्वान् ज्योतिष-