पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगळ. कडे पाहिलें असतां २२ व्या आकृतींत दाखविल्याप्रमाणें त्याचा आकार दिसतो. ह्या आकृतींत काळसर भाग दिसतो तो पाण्याचा भाग आहे, आणि पांढरा भाग दिसतो तो ज मिनीचा भाग आहे. मंगळ तांबूस दिसतो याचे कारण असे सांगतात कीं, मंगळावरील जमीन तांबूस रंगाची ह्मणजे म हाबळेश्वराच्या जमिनीसारखी आहे. मंगळावर ध्रुवांकडे दोन पांढरे शुभ्र ठिपके दिसतात. यावरून असें ह्मणतात कीं, पृ- थ्वीचे उत्तर व दक्षिण ध्रुव जसे बर्फानें आच्छादिलेले आहेत, तसेच मंगळाच्या ध्रुवांकडील प्रदेश बर्फानें आच्छादित असावेत. मंगळावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांकडे जसजसा उन्हाळा होत जातो, तसतसें बर्फ वितळून हे पांढरे भाग लहान लहान होत जातात; आणि जसजसा हिवाळा येत जातो तसतसे बर्फ अधिक होत जाऊन हे पांढरे भाग जास्ती मोठे दिसूं लागतात. यावरून, मंगळावर पाणी खचित असावें असें वाटतें. मंगळावर दाट वातावरण आहे असेंहि अनुमान क रण्यास जागा आहे. मंगळ आपल्या आंसावर २४ तास ३७ मिनिटें आणि २२.६६ सेकंद इतक्या वेळांत फिरतो. यावरून मंगळावरील दिवस आणि रात्र हीं पृथ्वीवरील दिवसरात्रींपेक्षां सुमारें अर्ध्या तासानें मोठीं येतील. सूर्याभोंवतीं एक फेरा करावयास मंगळास ६८७ दिवस लागतात; ह्मणजे, मंगळावरील वर्ष सरासरी आपल्या दोन वर्षांएवढे असतें. मंगळावरील वर्ष