पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगळ. ११३ ह्मणजे १५ कोटि ४५ लक्ष मैल अंतरावर असतो. पृथ्वी सूर्यापासून ९ कोटि २७ लक्ष मैल दूर आहे, आणि सूर्या- पासून मंगळाचें अंतर १४ कोटि १३ लक्ष मैल आहे. तेव्हां, मंगळ आपणांपासून साधारण १ कोटि मैल दूर आहे असें झालें. मंगळ आणि पृथ्वी हे ग्रह आपआपल्या कक्षेत सूर्या- भोंवतीं फिरत असतां कधीं कधीं मंगळ पृथ्वीपासून अतिश- य दूर - सुमारें २४/२५ कोटि मैल अंतरावर असतो, आणि कधीं कधीं अतिशय जवळ ३।४ कोटि मैल अंतरावर अस तो. ज्या वेळेस हा ग्रह पृथ्वीपासून अत्यंत दूर असतो, त्या वेळेस हा सूर्याच्या पलीकडेस असतो, ह्मणजे मंगळ आणि पृथ्वी यांच्या मध्यें सूर्य येतो. आणि ज्यावेळी हा ग्रह आप णांस अगदी जवळ असतो, त्यावेळीं हा व सूर्य यांच्यामध्यें पृथ्वी येते. मंगळ आणि सूर्य यांच्यामध्यें पृथ्वी आहे असा योग आला असतां, मंगळ षड्भांतरी ( ह्मणजे सूर्यापासून ६ राशींचे अंतरावर ) आला असें ह्मणतात. यावेळेस मंगळ हा आपणांस अगदी जवळ असतो. मंगळ षड्भांतरीं आला असतां तो पृथ्वीच्या फार जवळ येतो; कित्येक षड्- भांतर योगांचे वेळीं तर मंगळ पृथ्वीच्या फारच जवळ येतो, ह्मणजे पृथ्वीपासून त्याचें अंतर काय तें ३ कोटि ५० लक्ष मैल असतें ! जेव्हां मंगळ षड्भांतरी असतो-ह्मणजे तो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो तेव्हां मंगळाचा वेध घेण्यास उत्तम संधि असते हैं उघड आहे. अशा चांगल्या संधीस ८