पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ अंतरिक्षांतील चमत्कार. नुसत्या डोळ्यांनीं पाहिला असतां मंगळ लाल दिसतो. परंतु आकाशांत कित्येक तारे असे आहेत कीं, ते जरी मंगळाइतके लाल नाहींत, तरी लाल दिसण्यांत ते मंगळाच्या जवळ जवळ येतील. यामुळे, मंगळ सहज ओळखतां येत नाहीं. वृषभ राशींत जो रोहिणी नांवाचा तारा आहे, त्यासच कित्येक वेळां मंगळ असें लोक चुकीनें समजतात. पुष्कळ वेळां तर मंगळ रोहि- णीचे ताऱ्यासारखा दिसतो. यास्तव प्रथम पाहणारांस आका- शांत मंगळ ह्मणजे लवकर शोधून काढितां येईल असें नाहीं. परंतु कित्येक रात्रीं लक्षपूर्वक अवलोकन केलें असतां, असें आढळून येईल कीं, तांबूस दिसणाऱ्या अंतरिक्षस्थ जड पदार्थां- पैकीं, फक्त एकच जड पदार्थ एका जाग्यावरून दुसऱ्या जागीं जात असतो; आणि बाकीचे लाल जड पदार्थ आपल्या जाग्यावरून हालत नाहींत. यावरून, जो तांबूस दिसणारा आकाशस्थ जड पदार्थ काहीं रात्रींत आपल्या जाग्यावरून हालला आहे असे पाहण्यांत येतें, तो मंगळ होय. कां कीं, मंगळ हा ग्रह आहे; आणि दुसरे स्थिर तारे आहेत. याप्र माणें, मंगळ ओळखण्यास सोपें पडतें. सूर्यापासून मंगळाचें मध्यम अंतर १४ कोटि १३ लक्ष मैल आहे. सर्व ग्रहांप्रमाणे मंगळ हा ग्रह सूर्याभोंवतीं दीर्घ वर्तुला- कार मार्गानें फिरतो. यामुळे, सूर्याभोवती फिरत असतां तो एक वेळ सूर्याच्या अगदी जवळ-ह्मणजे १२ कोटि ८२ लक्ष मैल अंतरावर असतो; आणि एक वेळ सूर्यापासून फार दूर-