पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ अंतरिक्षांतील चमत्कार. वेध घेऊन मंगळाविषयीं बरीच माहिती ज्योतिषज्ञांनी मिळ- विली आहे. गेल्या सन १८७७ साली मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता. त्यावेळी दुर्बिणीनें मंगळाचे वेध घेऊन त्याच्याभोंवतीं फिरणारे दोन चंद्र आहेत हा शोध अमेरिकेतील प्रसिद्ध ज्योतिषी हॉल यांनीं लाविला. मंगळाचे वेध घेतल्यानें सूर्यापासून पृथ्वी वगैरे ग्रहांचें अंतरहि सम- जून येतें. यावरून मंगळाचे वेध घेणें किती अवश्य आहे हें दिसून येईल. हा ग्रह कधीं कधीं पृथ्वीच्या पुष्कळ जवळ येतो ह्मणून दुर्बिणीनें वेध घेऊन याविषयीं वरीच माहिती मिळवितां आली आहे, हें वर सांगण्यांत आलेंच. तथापि, चंद्रावरील प्रदेशा- विषयीं जितकें आपणांस कळले आहे, व कळावयाचा संभव आहे तितकें आपणांस मंगळाविषयीं कळून येईल असे वाटत नाहीं. कारण की, मंगळ जेव्हां पृथ्वीच्या फार जवळ असतो तेव्हां सुद्धां तो आपणांपासून चंद्रापेक्षां १५० पट दूर असतो ! पृथ्वीपेक्षां मंगळ बराच लहान आहे. मंगळाचा व्यास ४२०० मैल आहे, ह्मणजे तो पृथ्वीच्या व्यासाच्या ( ८००० मैलांच्या ) अर्ध्याहून थोडा अधिक आहे. २१ व्या आकृतीवरून पृथ्वी आणि मंगळ यांचें परस्पर आकार- मान वाचकांच्या लक्षांत येईल. मंगळावर पृथ्वीप्रमाणेच जमीन पाणी असे दोन भाग आहेत, असें विद्वान् लोकांनीं अनुमान केलें आहे. कारण, दुर्बिणीनें मंगळा-