पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगळ. १११ सहावे भागांत शुक्राचें थोडेंसें वर्णन केलें. इतर ग्रहांप्रमाणें पृथ्वीहि सूर्याभोंवतीं फिरणारा ग्रह असल्यामुळे तिची मार्गात गांठ पडते. यास्तव, तिचेंहि थोडेंसें वर्णन सातव्या भागांत ग्रह या नात्यानें करण्यांत आलें; आणि त्याच भागांत पृथ्वीभोंवतीं फिरणारा चंद्र याविषयीं आपणांस काय काय समजले आहे ते॑ पाहिलें. आतां, पृथ्वी सोडल्यावर सूर्यमालेचा प्रवास पुढे चालविला असतां, बाह्यग्रहांपैकी पहिला ग्रह जो मंगळ तो. आपणांस पहिल्यानें भेटतो. यास्तव, आतां मंगळाविषयीं आपणांस कितपत माहिती आहे तें पाहूं. आपण पृथ्वी या ग्रहावर राहतों; आणि सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षां मंगळ व शुक्र हे दोन ग्रह पृथ्वीला अधिक जवळ आहेत. ह्मणून, या दोन ग्रहांविषयीं आपणांस विशेष माहिती मिळाली पाहिजे असें प्रथम वाटतें. परंतु, शुक्राचें तेज विशेष असल्यामुळे दुर्बिणींतून शुक्राकडे पाहिले असतां डोळे दिपतात. ह्मणून, शुक्राविषयीं चांगलीशी माहिती आ- पणांस मिळण्यास मार्ग नाहीं. पण, मंगळाचें तेज शुक्राइतकें प्रखर नसल्यामुळे या ग्रहाविषयीं अधिक माहिती समजली आहे. मंगळाचे सूक्ष्म वेध मोठमोठ्या विद्वान् लोकांनीं घेऊन इतकी माहिती जमविली आहे कीं, तितकी माहिती चंद्रा- इतर कोणत्याहि अंतरिक्षस्थ जड पदार्थाविषयीं आ पणांस अद्याप मिळाली नाहीं.