पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ अंतरिक्षांतील चमत्कार. तात. याप्रमाणें, प्रत्येक पदार्थ दुसऱ्या पदार्थास आपल्याकडे सतत ओढीत असतो. पृथ्वी आपले आंसावर फिरत असतां, तिजवरचे सर्व प्रदेश चंद्राचे समोर येतात. ते चंद्राचे आकर्ष- णानें चंद्राकडे विशेष ओढिले जातात. त्यांत पाणी हें विरळ व हलकें असल्यामुळे जमिनीपेक्षां अधिकच ओढिलें जातें. यामुळे समुद्र चंद्रासमोर आले असतां त्यांतील पाणी वर मो- ठ्या वेगानें उसळू लागतें. याप्रमाणें समुद्राचें पाणी वाढूं लागलें ह्मणजे भरती होते. सुमारें सहा तास पाणी वाढत असतें. पुढें भरती पुरी होऊन सुमारें १२ मिनिटें पाणी त- सेंच राहतें. यास समा ह्मणतात. मग, सुमारें सहा तास पाणी ओसरत असतें, आणि सर्व पाणी ओसरल्यावर १२ मिनिटें तसेंच राहतें. तेव्हां त्यास निखार ह्मणतात. मग, पुनः भरती सुरू होते. याप्रमाणे २४ तास आणि १० मिनिटें इतक्या काळांत दोन भरत्या व दोन ओहट्या होतात. सूर्याचे आ कर्षणानेंहि भरती होते. परंतु, सूर्य अत्यंत दूर असल्यामुळे, ती भरती विशेष लक्षांत येण्यासारखी नसते. तरी, अमावा- स्येच्या दिवशीं सूर्य व चंद्र एकाच दिशेस असतात. ह्मणून, त्यांचीं त्या दिवशीं आकर्षणें एक होऊन भरती एरव्हींच्या पेक्षां जास्त येते. आणि, पौर्णिमेच्या दिवशीं सूर्य व चंद्र एक- मेकांसमोर येतात, व त्यांची आकर्षणें समोरासमोर येतात ह्म- णून त्या दिवशींहि भरती एरव्हींच्या पेक्षा जास्त येते.