पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंद्र. १०७ • चंद्राच्या योगानें आपल्या पृथ्वीवर एक विशेष महत्त्वाची गोष्ट दररोज घडून येते. ती ध्यानांत ठेवण्यासारखी व वि- चार करण्यासारखी आहे. कांहीं कारणांमुळे चंद्र जर आका- शांतून नाहींसा झाला, तर समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश खे- रीज करून पृथ्वीवरील वाकीचे भागांत त्याविषयीं कदाचित् कांहीं वाटणार नाहीं. परंतु, समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशांत ए- कच हलकल्लोळ होऊन जाईल ! 'अहो, भरती ओहटी अ गदर्दी बहुतेक बंद झालीः' याप्रमाणें लोकांचे दुःखोद्गार मुंबई, रत्नागिरी, राजापूर वगैरे प्रत्येक बंदरांतून आपणांस ऐकूं येतील. भरती ओहटी बंद झाल्यास बंदरांत जहाजें होड्या हीं येऊं शकणार नाहींत, व आंत आलेलीं बाहेर काढितां येणार नाहींत; आणि समुद्रकिनाऱ्यांवरील व्यापार अगदीं बसून जा- ईल ! व्यापाऱ्यांची जहाजें, मचवे, होड्या हीं भरतीमुळे वं दरांत येतात, आणि ओहटीमुळे वंदरांतून बाहेर काढतां येतात. भरती ओहटी मुख्यत्वेंकरून चंद्राचे योगानें होते. आणि समुद्राजवळील प्रदेशांत व्यापार भरती ओहटीवर चा- लत असतो. तेव्हां, चंद्र आपल्या किती उपयोगी पडतो वरें! चंद्राचे योगानें भरती ओहटी होते ती अशी. सर्व पदार्थ ए कमेकांस आपआपल्या सामर्थ्यानुरूप ( आकाराच्या मानानें ) ओढीत असतात. पृथ्वी चंद्रास आपल्याकडे ओढिते; आणि चंद्र पृथ्वीस आपल्याकडे ओढितो. सूर्य सर्व ग्रहांस आपल्या- कडे ओढितो, आणि सर्व ग्रह सूर्यास आपआपल्याकडे ओढि-