पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ८. मंगळ. ज्या ग्रहांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आंत आहेत, त्यांस अंतर्ग्रह ( आंतील ग्रह ) ह्मणतात; आणि, ज्यांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहेत, त्यांस बाह्यग्रह ( बाहेरील ग्रह ) ह्मणतात. बुध आणि शुक्र हे ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या आंत सूर्याभोंवतीं फिरतात. यास्तव, हे दोनच ग्रह सूर्यमालेंतील अंतर्ग्रह होत. बाकीचे पांच मोठे ग्रह- मंगळ गुरु, शनि, युरेनस आणि नेप्च्यून हे बाह्यग्रह होत. ३ या आकृतीवरून ग्रहांचे अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह असे दोन भेद कसे होतात, हें स्पष्टपणें समजेल. अमुक ग्रह अंतर्ग्रह आहे, किंवा बाह्यग्रह आहे, हें सहज ओळखितां यावें ह्मणून कांहीं विशेष गोष्टी ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत. त्यां- पैकीं कांहीं सांगतोंः- ( १ ) अंतर्ग्रह सूर्याच्या विशेष जवळ असतात. यास्तव, आकाशांत मध्यरात्रीं अंतर्ग्रह पाहूं ह्मटलें असतां, ते आपणांस दिसावयाचे नाहींत. परंतु, प. म. द. वा. पोतदार, ग्रंथ संग्रह