पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. ण्यांत आले असते. परंतु पृथ्वीवरून निरभ्र वातावरणांतून दुर्बिणीच्या साह्यानें चंद्राकडे पाहिले असतां त्यावर महा- सागर, समुद्र, सरोवरें, नद्या वगैरे कांहींच आपणांस दिसत नाहींत. मेघ किंवा धुर्के सुद्धां दृष्टीस पडत नाहीं. यावरून चंद्र हा केवळ निर्जल भयाण प्रदेश आहे असें ज्योतिः शास्त्रज्ञ ह्मणतात. वनस्पति व प्राणी यांचे जीवनास पाण्याप्रमाणें हवाहि आवश्यक आहे. पृथ्वीसभोंवतीं जसें कित्येकांच्या मतें १००।१२५ मैलपर्यंत उंच वातावरण पसरले आहे, तसेंच चंद्रावर वातावरण असावें असें वाटत नाहीं. ताज्याच्या जवळ चंद्र आला असतां, तारा एकदम दिसेनासा होतो, व पुनः कांहीं वेळानें तो एकदम दिसूं लागतो. चंद्रावर सूर्याचा प्रकाश एकदम पडतो व तो एकदम नाहींसा होतो. चंद्रावर जर वातावरण असतें, तर असें होतेंना. सूर्याचा प्रकाश पडत पडत पडला असता, व जात जात गेला असता. यावरून, चंद्रावर वातावरणहि नाहीं ही गोष्ट सिद्ध होते. पाणी आणि वातावरण हीं जर नाहींत, तर चंद्रावर वनस्प- ति आणि प्राणी हीं कशीं राहूं शकतील? पाणी व वातावर- ण नसल्यामुळे पृथ्वीप्रमाणें वनस्पति व प्राणी चंद्रावर नाहींत इतकेंच खरें. परंतु, दुसऱ्या कसल्याहि भिन्न प्रकारच्या वन- स्पति व प्राणी चंद्रावर नसतील असें आपण कसें ह्मणावें? आपल्या पृथ्वीवरील वनस्पति व प्राणी यांहून अगदीं भिन्न प्रकारच्या वनस्पति व प्राणी कदाचित् चंद्रावर असतील!