पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५. दऱ्या, खोरीं, डोंगर, व पर्वत दृष्टीस पडतात. परंतु, पृथ्वीवर जशीं गर्द अरण्यें आढळतात, तशीं चंद्रावर असतील असें मुळींच वाटत नाहीं. तेथें झाडझुडूप कांहीं नाहीं, प्राण्यांची वसति असावी असेंहि वाटत नाहीं. असें कां असावें ? पृथ्वी- प्रमाणें चंद्र गोल दिसतो. पृथ्वीप्रमाणेंच चंद्रास उजेड व उ प्णता हीं सूर्यापासून मिळतात. चंद्रावरचे दिवस व रात्र हीं जरी आपल्या पंध्रवड्याएवढीं मोठीं आहेत, तरी तेथेंहि दिवसरात्रीचें कालमान आहेच. आतां हें खरें कीं, चंद्रावर वनस्पति किंवा प्राणी आहेत की नाहींत हे मोठ्या दुर्बिणीं- तून सुद्धां प्रत्यक्ष पहाण्यास सांपडत नाहीं. कारण, जेवढे ह्मणून एखाद्या मोठ्या देवळाइतकें तरी मोठें असेल, तेवढें मात्र दुर्बिणींतून दिसू शकेल. तेव्हां, झाडझुडूप व प्राणी हे चंद्रावर असले तरी, आपणांस मोठ्या शक्तीच्या दुर्बि णींतून सुद्धां प्रत्यक्ष दिसावयाचे नाहींत. यास्तव, चंद्राच्या एकंदर पृष्ठभागावरील सर्व गोष्टींचा सूक्ष्म विचार करून तेथें वनस्पति व प्राणी असतील कीं नाहीं, याविषयीं अनुमान तरी काय निघतें हें पाहूं. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या जीव- नास पाणी आवश्यक आहे असें आपण पहातों. आणि चं- द्रावर पाणी तर मुळींच आढळून येत नाहीं. चंद्रावर जर पाणी असतें, तर पाण्याचे ढग व ढगांचीं निरनिराळी रूपांतरें हीं अवश्य दिसून आली असतीं. मंगळावरील समुद्र जसे दुर्बिणींतून दिसून येतात, तसे चंद्रावरील समुद्र आपले पहा- चंद्र.