पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ अंतरिक्षांतील चमत्कार. आहे. चंद्र अत्यंत लहान आहे. सूर्यावर अत्यंत प्रचंड उष्ण- ता आहे हे आपणांस माहीत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत समुद्र वगैरे असून हा पृष्ठभाग जरी थंड आहे, तरी पृथ्वीचा आंतील भाग बराच उष्ण आहे. यावरून हे उघड आहे कीं, जितका पदार्थ मोठा तितका त्यास निवण्यास वेळहि अधिक लागतो. लोखंडाचा तापलेला मोठा गोळा निवण्यास कित्येक दिवस लागतील, आणि लहान गोळा कांहीं तासांतच निवून जाईल. सूर्यमालेतील पदार्थ प्रथम कशानें का उष्ण झालेले असेनात; इतकें खरें आहे कीं, हे सर्व पदार्थ कित्येक युगांचीं युगें निवत चालले आहेत. सूर्य एवढा मोठा आहे कीं, त्यास निवण्यास पुरेसा वेळ अद्याप झाला नाहीं. पृथ्वी लहान असल्यामुळे तिचा पृष्ठभाग निवून प्राण्यांस राहतां ये- ईल इतका थंड होऊन गेला आहे. आणि, चंद्र सर्वांत अत्यंत लहान आहे; यास्तव चंद्र हा अगदींच निवून थंडगार झाला आहे. किती वर्षांपूर्वी ज्वालामुखी पर्वत चंद्रावर जळत होते हें सांगण्यास कांहीं मार्ग नाहीं. याविषयीं फार झालें तर अ- नुमान करितां येईल. ज्या वेळेस ज्वालामुखी पर्वतं चंद्रावर जळ- त होते, त्या वेळेस पृथ्वीवर वनस्पति किंवा प्राणी असण्याचा संभव नव्हता. सारांश, चंद्र थंडगार होऊन गेल्यास कोट्या- वधि वर्षे झाली असावीत हें खरें आहे ! आतां चंद्रावरील देखावा इतका उजाड व भणभणीत कांदि- सतो याविषयीं विचार करूं. दुर्बिणींतून पाहिले असतां चंद्रावर