पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंद्र. १०३ ण्यांत येतात, ते समुद्र असावेत अशी प्राचीनकाळचे लोकां- ची समजूत होती. या भागांस हल्लींहि समुद्रच ह्मणतात. परंतु यांत पाणी मात्र नाहीं हें लक्षांत ठेविले पाहिजे. वास्त- विक पाहतां हे भाग खोल दऱ्या आहेत. तसेंच या आकृतींत उंच दिसणारे भाग दाखविले आहेत. हे भाग चंद्रावरील मोठ- मोठ्या पर्वतांच्या रांगा आहेत. या आकृतींत सर्वांत विल- क्षण वाटणारें असें कड्याच्या आकृतीचें जें दिसत आहे, तें चंद्राचे पृष्ठभागावर चहूंकडे दाट पसरले आहे. हे पदार्थ चंद्रावरील विझालेल्या ज्वालामुखी पर्वतांची तोंडें होत. हीं तोंडे शेंकडों मैल रुंद आहेत; आणि त्यांचे शेजारील पर्वत ह जारों फूट उंच आहेत. पूर्वी - लाखों वर्षांपूर्वी - चंद्रावर मोठमो- ठे ज्वालामुखी पर्वत होते, असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. पृथ्वीवरील ज्वालामुखी पर्वतांप्रमाणें चंद्रावरील ज्वाला- मुखी पर्वतांतून उष्ण पदार्थ आतां बाहेर पडत नाहींत. हे ज्वालामुखी पर्वत हल्लीं अगदीं विझून गेले आहेत. यांस वि- झून गेल्यास, पन्नास नाहींत, शेंकडों नाहींत, हजारों नाहींत, तर लाखों वर्षे झाली असतील! परंतु पूर्वी एकदां हे पर्वत जळत होते, असें आज चंद्रावर जो विलक्षण देखावा दृष्टीस पडतो त्यावरून स्पष्ट दिसतें. चंद्रावरचे हे ज्वालामुखी पर्वत आज विझालेले असे कां दृष्टीस पडतात? याचें कारण मोठें विचार करण्यासारखें आहे, तें असें. सूर्य, पृथ्वी, व चंद्र, हे तीन गोल मनांत आणा. या तिहींपैकीं सूर्य हा अत्यंत मोठा