पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंद्र. २ ९७ सूर्यमालेतील ग्रहांविषयीं क्रमाक्रमानें विचार करीत असतां, जेव्हां आपण पृथ्वीविषयी विचार करावयास लागतों, तेव्हां ग्रहांशिवाय सूर्यमालेतील दुसऱ्या एका प्रकारच्या जड पदा- र्थांविषयीं विचार करणें जरूर पडतें. हे पदार्थ उपग्रह होत. उपग्रह ह्मणजे ग्रहाभोंवतीं फिरणारा दुसरा ग्रह बुध आणि शुक्र या ग्रहांस उपग्रह नाहींत. यास्तव, या ग्रहांविषयीं माहिती सांगत असतां उपग्रहांविषयीं विचार करण्याची आवश्यकता पडली नाहीं. परंतु, आपल्या पृथ्वीला एक उप- ग्रह असल्यामुळे, या भागांत पृथ्वीचें वर्णन करितांना तिचा उपग्रह जो आपला चंद्र त्याविषयींहि कांहीं माहिती सांगणें ओघानेंच येतें. पृथ्वी जशी सूर्याभोंवतीं फिरते, तसा चंद्र आपल्या पृथ्वी- भोंवतीं फिरतो. आणि सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरत असतां तिच्या भोंवतीं चंद्र हा फिरत असतो; ह्मणून पृथ्वीबरोबर चंद्राचीहि प्रदक्षिणा सूर्याभोंवतीं होते. आपणांस अंतरिक्षांतील सर्व जड पदार्थांपेक्षां चंद्र हा अत्यंत जवळचा जड पदार्थ आहे. आतां हें खरें कीं, कधीं कधीं चंद्रापेक्षांहि एखादा धूमकेतु आपल्या जवळ येऊन जातो. परंतु असा एखादा धूमकेतु खेरीज करून चंद्रापेक्षां बाकीचे सर्व अंतरिक्षस्थ जड पदार्थ आपणांपासून हजारों- ७