पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. थंडगार होईल, आणि चंद्राप्रमाणें चोहोंकडे निर्जन व निर्जल होऊन जाईल! पृथ्वीच्या सभोंवतीं हवेचें दाट आवरण आहे. हें वाताव- रण- हवेचें आवरण किंवा पांघरूण- १०० पासून ११० ० मैल - पर्यंत वर पसरलेलें आहे असें अनुमान केले आहे. यापेक्षां- हि अधिक उंच वातावरण असावें असें कांहीं लोक ह्मणतात. परंतु, जरी १००।१५० मैलांपेक्षां अधिक उंचपर्यंत वाता- वरण असले, तरी वर तें फारच विरल असले पाहिजे. पृथ्वी- च्या उत्तर ध्रुवांकडील प्रदेशांत कधीं कधीं जे तेजाचे मोठे पुंज दिसतात, व ज्यांस उत्तर अरुणोदय असें ह्मणतात, ते पुंज पृथ्वीच्या वातावरणांत विद्युत्प्रवाह चालून होतात, असें कांहींकांचे मत आहे. परंतु, वातावरणाची उंची फार झाली तर शंभर सवाशें मैल होईल, आणि उत्तर अरुणोदयाचे चमत्कार तर पृथ्वीपासून वर सुमारें ४००।६०० मैलपर्यंत उंच दिसत असतात. यावरून, या अद्भुत अरुणोदयाचे चम- त्कारांचा आणि हवेचा निदान फारसा तरी परस्पर संबंध नसावा असे वाटतें. सूर्यावरील डागांचा आणि उत्तर अरु णोदय चमत्कारांचा कांहीं तरी परस्पर संबंध असावा यावि- पयीं पूर्वी चवथ्या भागांत सांगितले आहे. ह्या तेजाच्या पुंजांविषयीं हल्लीं आपलें ज्ञान अपूर्ण आहे हें कबूल केलें पाहिजे. यास्तव, त्यांविषयीं निश्चयात्मक अधिक कांहीं सांगतां येत नाहीं.