पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. लाखों-कोट्यावधि- -पट दूर आहेत. चंद्र आपणांस सूर्याएवढा मोठा दिसतो. परंतु वास्तविक पाहिलें तर तो सूर्यापेक्षां फारच लहान आहे. तो आकारानें इतका लहान आहे कीं, ६ कोटि चंद्र जेव्हां एकत्र करावे तेव्हां एक सूर्य होईल ! चंद्र इतका लहान असून आपणांस सूर्याएवढा दिसतो याचें कारण असें आहे कीं, सूर्यापेक्षां ४०० पट तो आपणांस जवळ आहे. सूर्य आपणांपासून ९ कोटि २७ लक्ष मैल अंतरावर आहे. परंतु चंद्र आपणांपासून फक्त २ लक्ष ४० हजार मैल दूर आहे. १५ व्या आकृतीवरून पृथ्वी आणि चंद्र यांचें परस्पर आकारमान कळून येईल. या दोन गोलांचा जर व्यास मोजला, तर पृथ्वीचा व्यास सुमारें ८००० मैल भरेल; व चंद्राचा २१६० मैल भरेल. तेव्हां, चंद्राचे व्यासाच्या सुमारें चौपट पृथ्वीचा व्यास आहे. चंद्राच्या आकाराच्या १० पट पृथ्वीचा आकार आहे, ह्मणजे १० चंद्र जेव्हां एकत्र करावे तेव्हां पृथ्वीएवढा मोठा एक गोल होईल ! ९८ चंद्र स्वतः निस्तेज आहे; त्यास स्वतःचा प्रकाश नाहीं. सूर्याच्या प्रकाशानें तो प्रकाशतो. चंद्रतेज सूर्यतेजापुढे इतकें क्षुद्र आहे कीं, सूर्याच्या प्रकाशाइतका प्रकाश पडावयास ६ लक्ष पूर्ण चंद्र एकदम आकाशांत उगवले पाहिजेत ! चंद्र पृथ्वीभोवती फिरतो ही गोष्ट, चंद्र ताऱ्यांमधून जातांना दिसतो त्यावरून दिसून येते. आज ज्या ताऱ्याजवळ चंद्र आहे, त्या ताऱ्याजवळ पुनः त्यास येण्यास सुमारें २७३