पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वी. पृथ्वीचा मध्य बिंदु आपणांपासून निदान ४००० मैल दूर आहे; आणि सर्वांत अत्यंत खोल अशी जी खाण पृथ्वीवर आहे, ती फक्त अर्धा मैल खोल आहे ! तेव्हां, पृथ्वीच्या ८० भागापर्यंत मात्र आपणांस आंत पृथ्वीच्या पोटांत जातां येतें. असें जरी आहे, तरी असें आढळून येतें कीं, जसजसें आंत जावें, तसतशी अधिक उष्णता भासते. ५० फूट खोल गेल्यास एक अंश उष्णता अधिक वाढते असें अनुभवास येतें. या मानानें पाहतां जर आपण १२ मैलपर्यंत पृथ्वीच्या आंत उतरलों, तर सर्व पदार्थ लाल तापून गेलेले आहेत असें आढळून येईल; आणि आंत १०० मैलांवर तर इतकी उष्णता असेल कीं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बहुतेक सर्व पदार्थ उष्णतेनें वितळून गेलेले सांपडतील. तसेंच, पृथ्वीवर जागजागीं धरणी- कंप होतात, ज्वालामुखी पर्वतांतून तापलेले पातळ पदार्थ बाहेर पडतात, इत्यादि गोष्टींवरूनहि पृथ्वीचा आंतील भाग प्रवाही किंवा निदान अत्यंत तप्त असावा असे वाटतें. मागें लक्षावधि वर्षांपूर्वी हा भूगोल आगीचा अत्यंत तापलेला लाल गोळा होता, व हल्लीं त्याचा वरचा भाग निवून प्राण्यांस राह- ण्यासारखा झाला आहे, असे विद्वानांचें मत आहे. मागें जर एक वेळ-लाखों वर्षांपूर्वी ही पृथ्वी अत्यंत उष्ण होती, आणि हल्लीं निवून वरील भाग वसति होण्याइतका थंड झाला आहे, तर पुढे ती अगदी निवून थंडगार कशावरून होणार नाहीं ? पुढें कोट्यावधि वर्षांनीं या भूगोलावरील सर्व उष्णता जाऊन तो अगदी