पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. कार असल्यामुळे पृथ्वी वर्षांतून एकदां सूर्याजवळ येते, व एकदां सूर्यापासून दूर असते. ज्यावेळेस पृथ्वी सूर्याचे फार जवळ येते, त्यावेळेस सूर्यापासून तिचें अंतर सुमारें ९ कोटि १० लक्ष मैल असतें, आणि ज्या वेळेस ती सूर्यापासून फार दूर असते, त्यावेळेस तिचें अंतर ९ कोटि ४० लक्ष मैल असतें. ज्यानेवारींत पृथ्वी सूर्याच्या फार जवळ असते, व जुलई महिन्यांत ती सूर्यापासून फार दूर असते. ह्मणजे, उन्हाळ्या- पेक्षां हिवाळ्यांत आपण ३० लक्ष मैल सूर्याच्या अधिक जवळ असतों! हिवाळ्यांत सूर्याच्या अधिक जवळ आपण असल्या- मुळे, आपणांस उष्णता एरवींपेक्षा अधिक भासावी ही गोष्ट खरी. परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं. कारण, जरी हिवाळ्यांत आपण सूर्याच्या फार जवळ येतों, तरी आपण ज्या प्रदेशांत राहतों तो पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्यापासून वळलेला अस ल्यामुळे दिवस लहान व रात्र मोठी असते व सूर्याचे किर णहि आपल्या भागावर सरळ न येतां तिरपे येतात. उन्हा- ळ्यांत याच्या उलट स्थिति होते. ह्मणून उन्हाळ्यांत उष्णता अधिक वाटते. पृथ्वीचा आंतील भाग वरील भागाप्रमाणेंच घट्ट आहे किंवा प्रवाही आहे, याविषयीं प्रश्न अद्याप वादग्रस्त आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर खोल खाणी खणल्या आहेत, व मनुष्यें या खोल खाणींत काम करितात. परंतु जरी ह्या खाणी आपणांस खोल वाटतात, तरी पृथ्वीच्या मानानें ही खोली कांहींच नाहीं. कारण,