पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वी. कलती फिरते. त्यामुळें, पृथ्वीचा उत्तरेकडील भाग कांहीं दिवस सूर्याकडे कललेला राहून दक्षिणेकडील भाग सूर्यापा- सून फिरलेला असतो. असें क्रमानें होतें. ह्मणून पृथ्वीवर सर्वत्र ठिकाणी एकच ऋतु न होतां निरनिराळे ऋतु होतात. प्राचीनकाळचे लोक सूर्य एक वर्षांत बारा राशींतून जातो, च त्यामुळे ऋतु होतात असें मानीत असत. परंतु ही सूर्याची वार्षिक गति खरी नव्हे, भासमान (खोटी) आहे. पृथ्वीच्या खऱ्या वार्षिक गतीमुळें सूर्यास गति आहे असा आपणांस भास होतो, हें मत कोपर्निकस यानेंच प्रसिद्ध केलें. व तेव्हां- पासून हें मत सर्व लोकांस ग्राह्य झाले आहे. पृथ्वीचा व्यास सुमारें ८००० मैल आहे; व तिचा परिघ २१००० मैल आहे. शुक्र व मंगळ या ग्रहांपेक्षां पृथ्वी किंचित् मोठी आहे. परंतु नेप्च्यून, युरेनस, शनि व गुरु या ग्रहांपेक्षां पृथ्वी ही फारच लहान आहे. सूर्याचे आका- रमानाशीं पृथ्वीचें आकारमान जेव्हां आपण ताडून पाहतों, तेव्हां तर आपली पृथ्वी अगदींच क्षुल्लक वाटते ! सूर्यापासून पृथ्वीचें मध्यम अंतर सुमारें ९ कोटि २७ लक्ष मैल आहे. प्रकाश दर सेकंदांत सुमारे १ लक्ष ८६ हजार मैल चालतो. तेव्हां, सूर्यावरील प्रकाश पृथ्वीवर येऊन पोंचण्यास सुमारें ८३ मिनिटे लागतात. ह्मणजे आपण पाहतों त्या क्षणीं आपणांस ज्या ठिकाणीं सूर्य दिसतो त्या ठिकाणीं तो वास्तविक पाहतां ८ मिनि- टांपूर्वी होता ! सूर्याभोंवतीं फिरण्याचा पृथ्वीचा मार्ग दीर्घ वर्तुला-