पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. दैनंदिन गतीशिवाय पृथ्वीस आणखी एक गति आहे. ती तिची वार्षिक गति होय. सर्व ग्रह व सूर्यमालेतील इतर जड पदार्थ जसे सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा करितात, तशी आपली पृथ्वीहि सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा करिते. ही प्रदक्षिणा करण्यास पृथ्वीला ३६५ दिवस ६ तास आणि ४ सेकंद इतका काळ लागतो. ह्मणून, आपण ३६५ दिवसांचें एक वर्ष धरितों. सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा करण्याचा पृथ्वीचा मार्ग दीर्घवर्तुलाकृति आहे. या मार्गास पृथ्वीची कक्षा ह्मणतात. पृथ्वीचे कक्षेची लांबी सुमारे ५८ कोटि मैल आहे; ह्मणजे, सूर्याभोंवतीं एक फेरा पुरा करावयास पृथ्वीस सुमारें ५८ कोटि मैल प्रवास करावा लागतो. आणि, हा ५८ कोटि मैलांचा प्रवास पृथ्वी ३६५ दिवसांत पुरा करिते! ह्मणजे, दर तासांत सुमारें. ६६००० मैल किंवा एका सेकंदांत सुमारें १८ मैल जाण्याची गति आपल्या पृथ्वीच्या अंगीं आहे असें होतें ! जो प्रवास आपल्या पृथ्वीसारखा मोठा गोल एक वर्षांत पुरा करितो, तो प्रवास पुरा करण्यास दर तासास ४० मैल जाणाऱ्या आगगाडीला १६०० हून अधिक वर्षे लागतील! ९२ ह्या वार्षिक गतीमुळे पृथ्वीवर ऋतु होतात. आतां पृथ्वी वरील सर्व प्रदेशांत ऋतु नेहमीं कायमचे असावेत ह्मणजे पृथ्वीच्या मध्यभागचे प्रदेशीं नेहमीं उन्हाळा असावा, अन्य प्रदेशीं हिवाळा असावा, असें प्रथम वाटतें. पण असें होत नाहीं. कारण पृथ्वी सूर्याभोंवतीं नीट उभी फिरत नाहीं, जरा