पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वी. २४ तासांची एक अहोरात्र आपण धरितों. प्राचीनकाळचे लोक असे समजत असत कीं, पृथ्वी स्थिर आहे, आणि सूर्य वगैरे सर्व आकाशस्थ ज्योति तिच्या भोंवतीं २४ तासांत एक प्रदक्षिणा करितात. परंतु, कोपर्निकस यानें असें सिद्ध केलें कीं, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी ही आपले आंसावर २४ तासांत फिरते, आणि त्यामुळे दिवस व रात्र होतात. याप्र माणें, पृथ्वीस दररोजची ( दैनंदिन ) गति आहे, हें तत्व कोपर्निकसाच्या वेळेपासून (इसवी सनाच्या सोळावे शतका- पासून ) सर्व लोक कबूल करितात. आर्यभट्ट ह्मणून एक विख्यात गणिती व ज्योतिषी आपल्या या हिंदुस्थान देशांत इसवी सनाचे ५वे शतकांत होऊन गेला. सूर्य वगैरे तारे स्थिर असून पृथ्वी आपले सभोंवतीं फिरते आणि या पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळें सूर्यादि आकाशस्थ सर्व जड पदार्थ पूर्वेकडून पश्चिमेकडे जातातसे आपणांस भासतात, असें आर्य- भट्टाचें कोपर्निकसाप्रमाणेंच मत होतें. हें आह्मीं मागें पहिल्या भागांत सांगितले आहे ते वाचकांच्या लक्षांत असेलच. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे देखावे होतात. पृथ्वी आपल्या आंसावर फिरत असतां, क्रमानें तिच्या एका अर्ध्या भागावर सूर्यप्रकाश पडतो, व दुसऱ्या अर्ध्या भागावर अंधार असतो. जेथें सूर्यप्रकाश पडतो तेथें दिवस असतो, आणि जेथें अंधार असतो तेथें रात्र आहे असें आपण ह्मणतों.