पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. तसेंच, जर आपण दक्षिणेस जाऊं लागलों, तर उत्तर ध्रुवाचा तारा आणि उत्तरेकडील तारे क्षितिजाच्या खालीं खालीं जातात, आणि दक्षिणेकडील तारे क्षितिजाच्या वर वर येऊं लागतात. असें पृथ्वीवर सर्व ठिकाणीं आढळून येतें. यावरून, पृथ्वी ही गोल आहे हें स्पष्ट दिसतें. अगदी प्राचीनकाळचे लोक पृथ्वी सपाट आहे असे समजत असत. परंतु वर सांगितलेलीं प्रमाणे पाहून पृथ्वीचा आकार गोलच आहे असें पुढें लोक मानूं लागले. टॉलमी ह्मणून जो इजिप्त देशांत एक नामां- कित ज्योतिषी इसवी सनाचे २रे शतकांत होऊन गेला, त्याच्या वेळचे लोक पृथ्वी गोल आहे असेंच मानीत असत. आपल्या हिंदुस्थानांतील आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्करा- चार्य वगैरे प्रसिद्ध ज्योतिषी हे, आतां पृथ्वीच्या गोलत्वा- विषयीं जीं कारणें सांगितलीं, हींच कारणे देऊन पृथ्वी गोलाकार आहे असे सिद्ध करीत. जरी पृथ्वीचा आकार गोल आहे असें वर सांगितलें आहे, तरी पृथ्वी अगदीं पूर्ण गोल नाहीं. ती. नारिंगासारखी उत्तर व दक्षिण ध्रुवांकडे कांहींशी चपटी आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांप्रमाणे पृथ्वी आपल्या आंसावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. यामुळे सूर्य व आकाशांतील सर्व तारे हे सर्व पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात असे आपणांस भासतें. आपल्या आंसावर एक वेळ फिरण्यास पृथ्वीस २३ तास ५६ मिनिटें आणि ४ सेकंद इतका वेळ लागतो. ह्मणून, सुमारें ,