पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वी. ८९ बुधादि ग्रह गोलाकार आहेत. आतां, हें खरें कीं सूर्यमालेत येणाऱ्या शेंडेनक्षत्रांचा आकार वाटोळा नसतो. परंतु, शेंडे- नक्षत्रें ग्रहांप्रमाणे जड नाहींत. त्यांचा बहुतेक भाग वायुरूपी आहे. तेव्हां, जर सूर्यमालेतील सर्व जड पदार्थ कमी अधिक वाटोळे आहेत, तर आपली जड पृथ्वीहि वाटोळी कां नसावी? याप्रमाणे अनुमानावरून तर आपली पृथ्वी गोला- कार आहे असें होतें. आणखी याशिवाय पृथ्वीच्या गोल त्वाविषयीं प्रत्यक्षप्रमाणें बरींच मिळतात. त्यांपैकी काहीं सांगतों. दुरून गलबत येतांना जर आपण समुद्रकिनाऱ्याव- रून पहात बसलों, तर समुद्राचा पृष्ठभाग गोल आहे, यावि- षयीं तेव्हांच आपली खात्री होईल. समुद्रकिनाऱ्यावरील लोकांस दुरून येणाऱ्या गलवतांच्या डोलकाठ्यांचीं शिडें प्रथम दृष्टीस पडतात. मग जसजसें गलवत किनाऱ्याकडे येऊं लागतें, तसतसा त्याचा मधला भाग दिसूं लागतो; आणि नंतर त्याचा खालचा भाग दिसतो. तसेंच, जर गलबत समु- द्रांत दूर जाऊं लागलें, तर किनाऱ्यावरून त्याचा खालचा भाग प्रथम दिसेनासा होतो; नंतर त्याचा मधला भाग आणि नंतर त्याच्या डोलकाठ्यांचीं शिडें हीं दिसेनाशीं होतात. याव- रून, समुद्राचा पृष्ठभाग गोल आहे, आणि ह्मणून पृथ्वीहि गोल आहे असें उघड होतें. उत्तरेकडे जसजसे आपण जावें तसतसा उत्तर ध्रुवाचा तारा क्षितिजाच्या वर वर येत जातो, व नवीं नवीं नक्षत्रें क्षितिजाच्या वर वर येऊं लागतात.