पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. पृथ्वी ही सूर्यमालेंतील तिसरा ग्रह असल्यामुळे, सूर्याव रून निघून प्रथम आपण बुधावर येतों; नंतर शुक्रवात लागतो; आणि तिसऱ्या मुक्कामास आपण आपल्या पृथ्वीवर येऊन पोंचतों. हा ग्रह आपलें घर आहे. तेव्हां, सर्व ग्रहां- पेक्षां या ग्रहाविषयीं आपणांस माहिती विशेष आहे, हें उघड आहे; आणि सर्वांस दुसऱ्याच्या घरापेक्षां आपल्या स्वतःच्या घरची माहिती विशेष असते हैं कोणीहि कबूल करील. बुध आणि शुक्र या ग्रहांप्रमाणें पृथ्वी सूर्याभोंवतीं एकटी फिरत नाहीं. तर, आपल्या उपग्रहास ह्मणजे चंद्रास नेहमीं वरो- बर घेऊन ही सूर्याभोंवतीं भ्रमण करीत आहे. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा मोठा विश्वासू सेवक आहे अशी उपमा त्यास दिल्यास हरकत नाहीं. कां कीं, अंतरालांत पृथ्वी कोठेंहि जावो, तिच्या बरोबर हा विश्वासू सेवक असावयाचाच. तेव्हां, पृथ्वीच्या वर्णनाबरोबर तिला कधींहि न सोडणारा तिचा सहचर अगर चाकर ह्याचेंहि वर्णन येणें रास्त आहे. त्याच्या साहचर्यत्वानें तो तिचा एक भागच होऊन राहिला आहे. सवव चंद्राचें वर्णन असल्याशिवाय पृथ्वीचें वर्णन पुरे होणार नाहीं. · ह्मणून, चंद्राविषयींहि माहिती याच भागांत पुढे निराळी दिली आहे. ८८ सूर्यमालेंतील बहुतेक सर्व जड पदार्थ वाटोळे गोल आहेत. तेव्हां आपल्या पृथ्वीचाहि आकार गोल असला पाहिजे हें अनुमान सहजच निघतें. सूर्याचा आकार गोल आहे, आणि