पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७. पृथ्वी आणि चंद्र. पृथ्वी. या भागांत पृथ्वीचें वर्णन पाहून वाचकांस प्रथमदर्शनीं शंका येईल कीं, 'अंतरिक्षांतील चमत्कार' या पुस्तकांत मध्येच 'भूगोलवर्णन' कोठून आलें ! परंतु, पृथ्वी ही ताऱ्यांप्रमाणेंच अंतरिक्षांतील एक गोल आहे, आणि सूर्यमालेतील इतर ग्रहां- प्रमाणे एक ग्रह आहे, या गोष्टीकडे अंमळ लक्ष दिले असतां वाचकांची शंका सहज दूर होणार आहे. आह्मी सूर्यमाले तील ग्रहांचें वर्णन अनुक्रमानें करीत आहों, आणि त्याप्रमाणें बुध व शुक्र या प्रथम दोन ग्रहांचें वर्णन मागील दोन भागांत केलें. सूर्यमालेतील तिसरा ग्रह आपली पृथ्वी असल्यामुळे, ‘ग्रह' या दृष्टीनें तिचें वर्णन या भागांत केलें आहे.