पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुक्र. ८५ अनेक अद्भुत गोष्टी आपणांस गणितशास्त्राच्या साह्यानें सम- जून येतात. शुक्रसंक्रमणापासून केवढा लाभ हा ! शुक्रसंक्र- मण ह्मणजे अंतरिक्षांतील चमत्कारभांडारगृहाची एक अद्भुत किल्लीच समजावयाची ! यावरून, शुक्रसंक्रमण पाह- ण्याविषयीं ज्योतिषी लोक फार उत्सुक कां असतात हें सहज लक्षांत येण्यासारखें आहे. सन १८७४ आणि सन १८८२ या सालीं झालेलीं शुक्राचीं दोन संक्रमणें आपल्या काळच्या लोकांस पाहण्यास सांप- डलीं. ह्या संक्रमणांचा वेध घेण्याकरितां यूरोपांत आणि अमे फारच गडबड उडून गेली होती. कारण कीं, आतां सन २००४ सालापर्यंत संक्रमणाचा योग येणार नाहीं. ह्मणजे आतां आपले पिढीचे लोकांस शुक्रसंक्रमण पाहण्याची संधि मुळींच मिळणार नाहीं ! तेव्हां एकाच पिढीचे लोकांस आठ वर्षांत दोन संक्रमणें पाहण्याची अपूर्व संधि आली असतां, या शतकांतील लोकांनी तीं संक्रमणे पाहण्याकरितां लाखों रुपये खर्च केले यांत कांहीं नवल नाहीं.