पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुक्र, ८१ लहान आहेत. शुक्रावर वट्ट वातावरण असावें असे अनु- मान कांहीं ज्योतिष्यांनीं काढिले आहे. आणि मोठमोठे वीस वीस पंचवीस पंचवीस मैल उंच पर्वत या ग्रहावर असावेत, असें कांहींकांचें मत आहे. परंतु, असे खात्रीपूर्वक सांग- ण्यास अद्याप चांगला आधार मिळाला नाहीं. पृथ्वीला जसा एक चंद्र आहे, तसा शुक्रालाहि एक चंद्र आहे, असे कांहीं ज्योतिष्यांनी गेल्या शतकांत प्रसिद्ध केलें होतें. पण, या १९ वे शतकाच्या अखेरीस सुद्धां पूर्वीपेक्षा मोठ्या दुर्बिणी लोकांजवळ असतां शुक्राच्या चंद्राचें दर्शन कोणासहि झाले नाहीं. तेव्हां, शुक्राचा उपग्रह पाहिला अशी जी गेल्या शतकांत कांहीं ज्योतिप्यांची समजूत झाली, ती चुकीची होती असें आतां पक्के ठरलें आहे. मग, पहावें आतां पुढें विसावे शतकांतील लोक काय ठरवितात तें! आकारानें शुक्र आणि आपली पृथ्वी हीं बहुतेक सार- खींच आहेत. पृथ्वीची आणि शुक्राची दैनंदिन गति बहुतेक सारखीच असल्यामुळे पृथ्वीवरील आणि शुक्रावरील दिवस- रात्र बहुतेक सारखी आहेत. आणि शुक्रावर वातावरणहि असावें असें ह्मणतात. तेव्हां, पृथ्वीवरील प्राण्यांसारख्या प्राण्यांची वस्ती शुक्रावर असेल काय, हे जाणण्याविषयीं आपण साह- जिकच उत्सुक होतों. शुक्रावरील हवेंत जर ऑक्सिजन वायु असेल, आणि तेथें जर पाणी असेल, तर पृथ्वीवरील प्राण्यांसारखे प्राणी शुक्रावर असण्याचा संभव पुष्कळच आहे.