पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ अंतरिक्षांतील चमत्कार. आतां हें खरें कीं, पृथ्वीपेक्षां शुक्र सूर्याचे अधिक जवळ असल्यामुळे तेथें सूर्याच्या उन्हाचा ताप अर्थात् अधिक असला पाहिजे. पृथ्वीवरून जेवढा सूर्य दिसतो, त्याच्या दुप्पट मोठा सूर्य शुक्रावरून दिसतो. तेव्हां, उष्णताहि या मानानें दुप्पट असली पाहिजे. परंतु, एवढ्यावरूनच शुक्रावर प्राणी नस- तील असें मात्र ह्मणतां येत नाहीं. कां कीं, हवेच्या योगानें सूर्याच्या उष्णतेत पुष्कळ फरक पडतो, हें अनुभवसिद्ध आहे. शिवाय, आपल्या या पृथ्वीवर उष्ण प्रदेशांत निरनिराळ्या प्रका- रच्या वनस्पति आणि प्राणी दृष्टीस पडत नाहींत काय? इतकेंच नव्हे, तर ध्रुवांकडील शीत प्रदेशापेक्षां उष्णकटिबंधांतील प्रदेशां- तच वनस्पति आणि प्राणी यांची विलक्षण समृद्धि दृष्टीस पडते. मग, शुक्राचे पृष्ठभागावर - निदान ध्रुवांकडील प्रदेशीं तरी - आपल्या उष्णदेशांतील वनस्पतींसारख्या वनस्पति आणि प्राण्यां- सारखे प्राणी असावेत असे अनुमान करण्यास काय हरकत आहे? शुक्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आंत असल्यामुळे शुक्र व पृथ्वी हीं सूर्याभोंवतीं आपआपल्या कक्षेत फिरत असतां, कधीं कधीं पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्यें बरोबर एकारेषेंत शुक्र येतो. त्यामुळें, शुक्र हा सूर्यबिंबावरून काळ्या ठिपक्यासारखा जातांना आपणां पृथ्वीवरील लोकांस दिसतो. ( आकृति १४ वी पहा.) या चमत्कारास शुक्रसंक्रमण- शुक्राचें सूर्यबिंबावरून जाणें - असें ह्मणतात. हा शुक्रसंक्रम- णाचा योग वरचेवर येत नसतो, कधींकाळीं येतो. कारण कीं,