पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. ण्यास या ग्रहास २२४ दिवस लागतात. व पृथ्वीस सूर्या- भोंवतीं एक प्रदक्षिणा करण्यास ३६५ दिवस लागतात. तेव्हां, असें ह्मणतां येईल कीं, शुक्रावरील एक वर्ष आपल्या सात सव्वासात महिन्यांएवढे असतें! सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा कर- ण्याच्या शुक्राच्या मार्गाची लांबी सुमारे ४३ कोटि मैल आहे. इतका प्रवास शुक्र २२४ दिवसांत करितो. याव- रून दर सेकंडांत २२ मैल प्रवास करण्याची शक्ति या ग्रहाचे अंगीं आहे असे दिसून येतें. शुक्राचें सूर्यापासून अंतर ६ कोटि ७० लक्ष मैल आहे, आणि पृथ्वीचें सूर्यापा- सून अंतर ९ कोटि २७ लक्ष मैल आहे. ह्मणून, शुक्र जेव्हां आपणांस अत्यंत जवळ असतो, तेव्हां तो आपणांपासून २ कोटि ५७ लक्ष (९२७०००००-६७००००००) मैलां- चर असतो; आणि, जेव्हां तो आपणांपासून अत्यंत दूर असतो, तेव्हां तो ( ९२७०००००+६७०००००० ०) १५ कोटि ९७ लक्ष मैलांवर असतो. यावरून शुक्र १३ व्या आकृतींत दाखविल्याप्रमाणें कधीं कधीं लहान कां दिसतो, आणि कधीं कधीं मोठा व तेजस्वी कां दिसतो याचे कारण वाचकांच्या लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं. ८० हा ग्रह २३ तास २१ मिनिटें इतक्या वेळांत आपल्या आंसावर एकवेळ फिरतो. ह्मणून, शुक्रावरहि आपल्या येथल्या प्रमाणेंच दिवस व रात्र होतात हे उघड आहे. मात्र, शुक्रा- वरील दिवसरात्र येथील दिवसरात्रीपेक्षां सुमारे अर्ध्या तासानें