पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुक्र. ७९ सूर्याच्या प्रकाशानें प्रकाशित भागापैकीं जितका या ग्रहाचा भाग पृथ्वीकडे वळलेला असेल तितका शुक्राचा भाग आपणांस दुर्बिणींतून दिसतो. यावरून चंद्राप्रमाणें शुक्रासहि कला होतात हें समजून येतें. १२ वे आकृतींत शुक्राच्या निरनिराळ्या कला दाखविल्या आहेत. जशा बुधाच्या कमी- जास्त होणाऱ्या कला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहींत, तशा शुद्धच्याहि कला आपणांस दुर्बिणीवांचून दिसत नाहींत. दुर्बिणीची युक्ति प्राचीन लोकांस माहीत नव्हती. यास्तव, चंद्राप्रमाणें शुक्रास कला असतात ही गोष्ट अर्थात् त्यांस समजली नव्हती. शुक्राच्या कलांविषयीं शोध प्रथम ग्यालि- लियो या ज्योतिष्यानें लाविला. शुक्र सूर्यापासून फार लांब कधीं जात नसतो. ह्मणून तो आपणांस आकाशांत फार रात्रपर्यंत दिसण्यांत येत नाहीं. शुक्र कधीं कधीं पहांटेस पूर्वेस दिसतो, आणि कधीं कधीं आवशीस पश्चिमेस मात्र दिसतो. शुक्र पहांटेस दिसतो त्या वेळेस तो सूर्योदयापूर्वी फार झालें तर दोन अडीच तासपर्यंत मात्र दिसावयाचा, आणि आवशीस दिसतो त्या वेळेस सूर्या- स्तानंतर दोन अडीच तासपर्यंत मात्र तो दिसण्यांत येतो. • सूर्यापासून या ग्रहाचें अंतर मध्यम प्रमाणानें ६ कोटि ७० लक्ष मैल भरतें. बुधाची कक्षा जशी फार दीर्घवर्तुळा- कार आहे तशी या ग्रहाची नाहीं. सूर्याभोंवतीं फिरण्याचा या ग्रहाचा मार्ग बहुतेक वर्तुळाकार आहे. सूर्याभोंवतीं फिर-