पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुध. ७३ पुरा करण्यास बुधाला फक्त ८८ दिवस लागतात. तेव्हां बुध एका सेकंडांत २९ मैल चालतो असें झालें. बुधाच्या कक्षेत एक फेरा पुरा करावयास ह्मणजे २३ कोटि २० लक्ष मैल जावयास दर तासास ४० मैल जाणाऱ्या आगगाडीला ६५० हून अधिक वर्षे लागतील! आणि, जो प्रवास करण्यास आगगाडीला देखील ६००/७०० वर्षे लागतील, तो प्रवास बुध केवळ ८८ दिवसांत पुरा करितो ! यावरून या ग्रहाच्या गतीचा वेग किती मोठा असला पाहिजे याची कल्पना वाच- कांस सहज करितां येईल. बुधाची सूर्याभोंवतीं प्रदक्षिणा ८८ दिवसांत - आपल्या सुमारें तीन महिन्यांत—पुरी होते, ह्मणजे बुधावरील एक वर्ष आपल्या तीन महिन्यांएवढे होय ! यामुळें, तीन महि- न्यांच्या अवधींत बुधावर सर्व ऋतु संपून जात असतील! बुधावर जर मनुष्य असलीं, तर आपल्या येथील २५ वर्षांचा मनुष्य तेथें १०० वर्षांचा समजला जाईल ! व येथील पांच सहा वर्षांचा मुलगा तेथील कालेजांत बी. ए. एम्. एच्या परीक्षेचा अभ्यास करीत असला पाहिजे! बुधाची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आंत असल्यामुळे हा ग्रह सूर्याभोवती फिरत असतां कधीं कधीं सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्यें बरोबर एका रेषेंत येतो. त्या वेळीं सूर्य चिंबाव- रून वाटोळ्या काळ्या ठिपक्यासारखा जातांना बुध दृष्टीस पडतो. यास बुधसंक्रमण-बुधाचें सूर्यविवावरून जाणें- असे