पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ अंतरिक्षांतील चमत्कार. शोध लाविल्याबद्दल प्राचीन ज्योतिष्यांच्या विशाळ बुद्धी- विषयीं आपणांस अचंबा वाटणार आहे. प्राचीनकाळचे शोधांविषयीं सूक्ष्म विचार केला असतां असें ह्मणावें लागतें कीं, एकंदर वस्तुस्थितीच्या मानानें पाहतां प्राचीन ज्योतिषी कमी बुद्धिवान् किंवा कमी शोधक होते असें नाहीं. सूर्यापासून बुधाचें अंतर मध्यम मानानें ३ कोटि ६० लक्ष मैल आहे. सर्व ग्रहांच्या कक्षा पूर्ण वर्तुळाकार (वाटोळ्या ) नाहींत, कमी अधिक दीर्घ वर्तुळाकार - बदामी आका- राच्या आहेत. आणि या ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग तर सर्व ग्रहांच्या मार्गांपेक्षां फारच दीर्घ वर्तुळाकार आहे. त्यामुळें, हा ग्रह नेहमीं सूर्यापासून सारख्या अंतरावर नसतो. हा कधीं कधीं सूर्याच्या अगदीं सन्निध येतो, आणि कधीं कधीं सूर्यापासून फार दूर जातो. जेव्हां हा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ येतो, त्या वेळेस सूर्यापासून ह्याचें अंतर २ कोटि ८५ लक्ष मैल असतें. आणि, जेव्हां हा फार दूर जातो तेव्हां ह्याचें अंतर ४ कोटि ३५ लक्ष मैलांपर्यंत असतें. ह्मणून, मध्यम प्रमाणानें पाहतां या ग्रहाचें सूर्यापासून अंतर ३ कोटि ६० लक्ष मैल असतें असें धरितात. बुधाचा सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याचा जो मार्ग आहे, त्याची लांबी सुमारें २३ कोटि २० लक्ष मैल भरते; ह्मणजे, सूर्याभोंवतीं एक प्रदक्षिणा करण्यास बुधाला २३ कोटि २० लक्ष मैल इतकें अंतर चालावें लागतें. आणि एवढा प्रवास