पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. ह्मणतात. बुधाच्या संक्रमणसमय वेध घेऊन असें पाहिलें आहे कीं, बुध हा पुर्ण वाटोळा ग्रह आहे. सूर्यमंडळावरून जातांना जरी बुध काळ्या ठिपक्यासारखा दिसतो, तरी, कधीं कधी त्या काळ्या ठिपक्याभोंवतीं किंचित् प्रकाशित अशी वाटोळी कोर दिसण्यांत येते. त्यावरून बुधावर घट्ट वाताव- रण असावें असें ह्मणतात. ७४ बुधाचा आकार पूर्ण गोल आहे; पृथ्वीसारखा दोन्ही ध्रुवांकडे किंचित् देखील चपटा नाहीं. बुधास स्वतःचा प्रकाश नाहीं. सर्व ग्रहांप्रमाणे हा ग्रहहि सूर्यतेजानें प्रकाशतो. नुसत्या डोळ्यांनी बुध चांदणीसारखा वाटोळा दिसतो. परंतु, दुर्वि- णींतून पाहिले असतां या ग्रहाच्या चंद्राप्रमाणें कला दिस- तात. शुक्राच्या कला जशा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहींत, तशा बुधाच्याहि कला दुर्बिणीवांचून दिसूं शकत नाहींत. १० व्या आकृतींत चंद्राप्रमाणें क्षय वृद्धि पावणाऱ्या बुधाच्या कला दाखविल्या आहेत. जे मोठे आठ ग्रह सूर्यमालेत आहेत त्या सर्वांत बुध ग्रह अत्यंत लहान आहे. याचा व्यास सुमारे ३००० मैल आहे. पृथ्वीपेक्षां बुध फारच लहान आहे. बुधासारखे १७ गोल जेव्हां एकत्र करावे, तेव्हां आकारानें पृथ्वीएवढा एक गोल होईल ! बुध फार लहान आहे; आणि त्यांतून तो नेहमीं सूर्याच्या सन्निध असल्यामुळे त्याचें तेज प्रखर असतें. त्यामुळे, या ग्रहा-