पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुध. लागला, हे पाहून आपण अगदीं आश्चर्यचकित होतों. बुधाचा शोध इतक्या प्राचीनकाळीं लागला आहे कीं, हा शोध कोणीं, केव्हां, व कसा लाविला याविषयीं कांहींच माहिती मिळत नाहीं ! जेव्हां दुर्बिणीची युक्ति निघाली नव्हती, आणि जेव्हां सूर्या- दिकांच्या गतींविषयीं फारशी माहितीहि मिळाली नव्हती, अशा अत्यंत प्राचीनकाळीं बुधाचा शोध लाविला गेला आहे. इतक्यावरून हा शोध लावणें हें अगदी सोपें व साधें काम होते असे नाहीं. सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर अंतरि- क्षाच्या पूर्वपश्चिम भागांचें सूक्ष्म अवलोकन ज्या पुरुषानें, कित्येक दिवस नव्हे तर कित्येक वर्षेपर्यंत, केलें असेल, त्याच पुरुषाचे हातून ज्योतिषशास्त्रांतील हा एक महत्वाचा शोध लागला असावा. अर्वाचीनकाळी ज्योतिषशास्त्रांत मोठमोठे महत्वाचे शोध लागले आहेत; आणि हे शोध एकामागून एक व अशा कांही विलक्षण तऱ्हेनें लागले आहेत कीं, तें पाहून आपण आश्चर्यानें अगदी थक्क होऊन जातो. अशा वेळी असे वाटतें कीं, ज्योतिषशास्त्रांतील शोधांचें श्रेय जें कांहीं आहे तें अर्वाचीन ज्योतिष्यांनाच आहे. परंतु, हा आपला समज अगदी चुकीचा होईल. या बुधग्रहा- च्याच शोधाविषयीं अंमळ विचार करावा; ह्मणजे, अलीकडे नेपच्यून ग्रहाचा शोध लाविल्याबद्दल अर्वाचीन ज्योतिष्यांच्या बुद्धिवैभवाचें जसें आपणांस आश्चर्य वाटतें, तसेंच, बुधग्रहाचा