पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. सूर्याभोंवतीं फिरत असतां सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो ते- व्हां—तो सूर्यमंडलावरून काळ्या ठिपक्यासारखा जातांना दिसेल. वॉटसन् या प्रसिद्ध ज्योतिप्यानें हा ग्रह सन १८७८ सालीं सूर्यग्रहणाच्या वेळीं सूर्याचे जवळ पाहिला; आणि, त्या पंडि तानें या ग्रहास व्हल्कन् हें नांव सुद्धा दिले. परंतु, त्यानंतर सूर्यग्रहणे पुष्कळ आलीं, तरी हा ग्रह पुनः पहाण्यांत आला नाहीं. यावरून, वॉटसन् ज्योतिष्यास जो दृष्टीस पडला, तो ग्रह नसून एखादा धूमकेतु असावा, असें हल्लीं युरोपां- तील ज्योतिषी समजतात. असें जरी आहे, तरी पुढे कधीं- काळीं बुधापेक्षांहि सूर्याच्या अधिक जवळचा ग्रह - एखादा असल्यास–सांपडेल असा संभव आहे. ७० तेव्हां, आज सर्व ग्रहांपेक्षां बुध हाच ग्रह सूर्याच्या जवळ आहे असे समजलें पाहिजे. या ग्रहाची कक्षा सूर्याच्या इतकी जवळ आहे कीं, हा ग्रह सूर्यापासून फार लांब कधीं जात नाहीं. त्यामुळे, नुसत्या डोळ्यांनीं बुध क्वचित् पाहण्यांत येतो. ज्या वेळेस बुध सूर्योदयापूर्वी सुमारे पावणेदोन तास अगो- दर उगवतो, किंवा सूर्यास्तानंतर पावणेदोन तासांनीं मावळतो, 'त्या वेळेसच हा ग्रह नुसत्या डोळ्यांनीं दिसण्याचा संभव असतो; एरव्हीं तो दिसावयाचा नाहीं. कोपर्निकस या महाज्योतिष्यास बुध कधींच दृष्टीस पडला नाहीं. ह्मणून त्या पुरुषास अंत- काळीं फार वाईट वाटलें! नुसत्या डोळ्यांनी हा ग्रह पाहण्याचें • इतकें कठिण असतां, या ग्रहाचा शोध अत्यंत प्राचीनकाळीं