पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५. बुध. a सूर्यमालेचा मध्य व नियंता जो आपला प्रचंड सूर्य त्यावि- षयीं माहिती मागील भागांत सांगितली. सूर्यमालेचा प्रवास करावयाचें मनांत आणून जर आपण प्रथम सूर्यावरून निघालों, तर आधीं बुध हा ग्रह आपणांस लागेल. कां कीं, सर्व ग्रहांत बुध सूर्यास अगदी जवळ आहे. बुधाचें वर्णन करावयास लागण्याचे पूर्वी येथें इतकें सांगणें इष्ट आहे कीं, बुधापेक्षांहि आणखी एखादा दुसरा ग्रह सूर्याच्या अधिक जवळ असावा, असे कित्येक ज्योतिष्यांचें मत आहे. असा एखादा ग्रह असल्यास तो सूर्याच्या अगदीं सन्निध असल्यामुळे एरव्हीं आपणांस दिसावयाचा नाहीं, हें तर उघड आहेच. कारण कीं, एक तर तो सूर्याचे खग्रास ग्रहणाच्या समयीं सूर्यतेज कांहीं वेळपर्यंत अगदीं लोपून जातें, तेव्हां दिसूं शकेल; किंवा त्या ग्रहाच्या संक्रमणाचे वेळीं-ह्मणजे तो ग्रह कै. म. म. द. वा. पोतदारस ग्रंथ संग्रह