पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. मिष्ट अन्न खातों, मधुर गायन ऐकतों, रमणीय पदार्थ पहातों-या सर्वांची कारणपरंपरा सूर्यापर्यंत जाऊन पोंच- ते. सारांश, या भूतलावर आपण राहतों; नाना- प्रकारचे व्यवसाय करितों ! अनेक तऱ्हेचे सुखोपभोग घेतों; - चोहींकडे सुंदर मनोरम देखावे पहातों; या सर्व गोष्टी उष्णता व उजेड हीं पृथ्वीला सूर्यापासून मिळतात ह्मणून आपणांस प्राप्त होतात. आणि, हीं सर्व कार्ये येथें पृथ्वीवर २ कोटि २७ लक्ष मैलांवर घडवून आणण्यास सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेचा केवळ दोन अब्जावा हिस्सा बस्स होतो !