पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. खालीं वसरत येतात. मेघांचें गडगडणें व विजेचें लकाकणें हीं सूर्याच्या उष्णतेचींच रूपांतरें होत. सू- र्यापासून उष्णता पृथ्वीला मिळत नसती, तर पाण्याचे व हवेचे देखील खडक बनून गेले असते. हजारों शत- कांपूर्वी सूर्याच्या उष्णतेमुळें पृथ्वीवर येथें अत्यंत मोठीं विस्तीर्ण अरण्यें झालीं होतीं, आणि त्या अरण्यांच्या आतां दगडी कोळशाच्या खाणी झाल्या आहेत. दगडी कोळसा ह्मणजे इतक्या वर्षे एक जागीं सांठून राहिलेलीं सूर्यकिरणेंच होत असें झटलें असतां चालेल. आज दगडी कोळसा व्यापारास व इतर कामांस किती आवश्यक आहे, हे सांगण्याची जरूर नाहीं. दगडी कोळशामुळें आगगाडी चालते हैं आपण पाह- तोंच. तेव्हां, काळोख्या रात्रीं नागिणीप्रमाणें फों फो करीत शेतांतून, दऱ्यांतून, पर्वतांवरून अति शीघ्र गतीनें धांवत जाणारी व शेंकडों खंडींचें ओझें वाहून नेणारी आग- गाडी, ही पर्यायानें सूर्याच्या उष्णतेमुळेंच चालते असें होत नाहीं काय? तसेंच, आगबोटी, गिरण्या वगैरे यंत्रांचे अनेक उपयोगी कारखाने चालण्याचें कारण सूर्याची उष्णता. वाफेनें चालणारी यंत्रें जशीं सूर्याच्या उष्णतेवर अवलंबून असतात, तशींच पाण्याच्या किंवा वाऱ्याच्या जोरावर चालणारी यंत्रें- पाणचक्या व पवनचक्या- सूर्याच्या उष्णतेवर अवलंबून अस वारे सुटतात, नद्या वाहतात, फळे पिकतात- आपण गोड दूध पितों, तात. याचे कारण सूर्याची उष्णता. 1