पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. सुख मिळतें याविषयीं थोडासा विचार करून हा भाग संप- बूं. या पृथ्वीवर प्राणिमात्रांच्या मूळ अस्ति- त्वासच सूर्य हा कारण आहे, हे पूर्वी एकवेळ सांगण्यांत आले आहेच. सूर्य जर नसता तर ही आपली पृथ्वीच नसती; मग, येथें मनुष्यादिक प्राण्यांची वसति कोठून असणार? सूर्य हा सर्वांच्या अस्तित्वास कारण आहे, इतकेच नव्हे, तर आपल्या सर्व सुखांसहि तो कारणभूत झाला आहे. मनुष्याच्या सुखाचीं व सोयीची सर्व साधनें सूर्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें अवलंबून आहेत, ही गोष्ट सूक्ष्म विचारांतीं स्पष्ट दिसून येते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रांतील पाण्याची वाफ होऊन तिचे वातावरणांत ढग बनतात, व त्यांपासून पर्जन्य पडतो; पाऊस पडला ह्मणजे नद्या, तलाव, वगैरे पाण्यानें भरून जातात; शेतें पिकून धान्यसमृद्धि होते; आणि मनुष्य, पशु, पक्षी यांचा उदरनिर्वाह होतो. या पृथ्वी- वर जें जें कांहीं घडून येतें तें सर्व सूर्याच्या उष्णतेमुळें. आपल्या पृथ्वीला फिरावयास लावण्यास, आणि येथें भूतला- वर वनस्पति व प्राणी यांच्या जीविताचा क्रम सुरू करण्यास व तो एकसारखा अबाधित चालू ठेवण्यास, मूळ कारण सूर्याची उष्णता. या पृथ्वीवर असंख्य घडा- मोडी ज्या शक्तींमुळे होत असतात, त्या शक्तींचा उगम सूर्याच्या उष्णतेपासून. सूर्यापासून मिळालेल्या शक्तीमुळेंच पाण्याचे धबधबे पडतात, व बर्फाचे खडपे उंच पर्वतांवरून ५